आमच्याविषयी

ग्रुप ग्रामपंचायत पेरनोली

आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत पेरनोली, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर हे निसर्गसंपन्न व शांत वातावरणात वसलेले गाव आहे. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, ऊस व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. गावात एकोप्याने राहणारी लोकसंख्या असून सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात. ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. शिक्षणासाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजरा परिसरात जातात. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा व विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात येतात.

ग्रामपंचायत पेरनोली, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर हे निसर्गाच्या कुशीत वसलेले, शांत आणि एकोप्याचे गाव आहे. येथे शेतीप्रधान जीवनशैली असून हिरवळ, स्वच्छ वातावरण आणि संस्कारयुक्त समाज ही गावाची ओळख आहे. ग्रामपंचायतीमार्फत विकास, स्वच्छता व मूलभूत सुविधा यावर सातत्याने भर दिला जातो. .

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत
img