ऐतिहासिक माहिती

ऐतिहासिक माहिती

पेरनोली गाव, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र हे प्राचीन काळापासूनच निसर्गसंपन्न व शांततेसाठी ओळखले जाणारे गाव आहे. या परिसरात लोककला, संस्कृती व परंपरा जपली गेली असून गावाच्या सामाजिक एकोप्याची परंपरा दिर्घकाळ टिकून आहे. पेरनोलीची ग्रामपंचायत २४ एप्रिल १९५७ रोजी स्थापन झाली आणि त्यानंतर गावाच्या विकासासाठी विविध शासकीय योजना राबवल्या जात आहेत. या गावातील लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून आहेत, तर काहीजण शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीसाठी आजरा व कोल्हापूर शहरात जातात. पेरनोली गावाचे नाव आजही आपल्या सौम्य वातावरण, हिरवळ आणि परंपरावादी जीवनशैली साठी प्रसिद्ध आहे.